वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती

89

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देश अनेक प्रलंबित राहिलेली ध्येये गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे  वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे स्वत:ला मार्गावरून विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केले. देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी कोविंद यांनी दूरदर्शनवरील भाषणाच्या माध्यमातून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी जमावाकडून होणारी हिंसा, महिलांवरील अत्याचार आदी विषयांवर भाष्य करत नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले.