वाढदिवसाची पार्टी दिली नाही म्हणून पिता–पुत्राने केले असं काही

88

पिंपरी, दि. १5 (पीसीबी) : मुलाच्या वाढदिवसाची पार्टी दिली नाही म्हणून पिता – पुत्राने एका इसमाला बेदम मारहाण केली. गायकवाड नगर, दिघी याठिकाणी शुक्रवारी (दि.14) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अतुल देवप्पा काटे (वय 32, रा. गायकवाड नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पिता शंकर सिरसाठ (वय 55) व त्याचा मुलगा स्वप्नील सिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाडनगर येथून जात होते. त्यावेळी मुलाच्या वाढदिवसाची पार्टी दिली नाही म्हणून आरोपी स्वप्नील सिरसाठ याने फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी विरोध करत असताना स्वप्नीलचे वडील शंकर सिरसाठ यांनी देखील फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर काठीने मारहाण केली.

WhatsAppShare