वाढत्या रुग्णसंख्येत घट…गेल्या २४ तासांमध्ये देशात ‘इतक्या’ करोनाबाधितांची नोंद

49

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. समोर येणारी आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे.

देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे. देशात काल दिवसभरात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड आजारामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४२ हजार ३१७ वर पोहोचली आहे.

देशात करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७३ कोटी ५ लाख ८९ हजार ६८८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ६५ लाख २७ हजार १७५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

WhatsAppShare