वाढत्या बुडीत कर्जाला यूपीए सरकार जबाबदार – रघुराम राजन

75

नवी दिल्ली, दि.११ (पीसीबी) – घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब आणि लांबलेल्या निर्णयांमुळे बँकांचे बुडीत कर्ज (एनपीए) वाढत गेले,  असा खुलासा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी  केला.

भाजपचे ज्येष्ठ खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावर संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात रघुराम राजन यांनी यूपीए सरकारच्या धोरणावर बोट ठेवले.