वाटसरू तरुणाला अडवून कोयत्याने मारहाण करून लुटले

137

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – वाटसरू तरुणाला चौघांनी नारळ सोलण्याच्या कोयत्याने व हाताने बेदम मारहाण करून लुटले. त्यानंतर पोलिसात तक्रार दिल्यास ‘तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. ही घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. 12) रात्री घडली.

जतीन टाक (वय 26, रा. रिव्हर रोड, पिंपरी), सलीम शेख (वय 25, रा. मिलिंदनगर, पिंपरी) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संजय सेवाराम तिलोकानी (वय 26, रा. पिंपरी मेन बाजार, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 13) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी संजय हे पिंपळे सौदागर येथे जाण्यासाठी निघाले होते. ते पिंपरीतील समृद्धी हॉटेलजवळ आले असता आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यानंतर आरोपींनी नारळ सोलण्याच्या कोयत्याने आणि हाताने मारहाण केली. फिर्यादी यांच्याजवळी पाच हजार 580 रुपयांचा माल आणि मोबाइल जबरस्तीने हिसकावून घेतले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare