वाजपेयी यांच्या  निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यास सुरूवात

713

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) –  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम कायम असून  एम्सने दिलेल्या माहितीनुसार वाजपेयींच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. तर दुसरीकडे अटबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यात येत आहे.  त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राजकीय नेते दिल्लीत आणि एम्स रुग्णालयात दाखल होत  आहेत. एम्समधील शव लेपन विभागाबाहेर पोलिस तैनात करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. तसेच अटलजींच्या नातेवाईकांनाही दिल्लीला बोलावण्यात आलेले आहे.

अटलजींच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा होऊ लागले आहेत.  त्यामुळे पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. वाजपेयींच्या घराबाहेर स्टेज तयार करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.