वाजपेयींना पाच दिवसांनी श्रद्धांजली;  सलमान खान ट्रोल

331

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात दिरंगाई केल्याने अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल झाला. वाजपेयींच्या निधनानंतर पाच दिवसांनी सलमानने ट्वीट केलं. त्यामुळे ‘टायगर सो रहा था’ अशाप्रकारच्या कमेंट्स ट्विटरवर केल्या जात आहेत.

सलमान सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त माल्टामध्ये आहे. काल, म्हणजेच २१ तारखेला रात्री सलमानने अटल बिहारी वाजपेयी यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली.

‘अटलजी यांच्यासारखे दिग्गज नेते, आदर्श राजकारणी, वक्ते आणि अतुलनीय माणूस गमावणे ही खरेच एक दुःखद भावना आहे’ अशा आशयाचे ट्वीट सलमानने केले. फीलिंग हा शब्द लिहितानाही सलमानने गफलत केली. फिलिंग ऐवजी फिईंग अशी स्पेलिंग मिस्टेक सलमानने केली.