वाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन

155

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – वयाच्या ९३ व्या वर्षी वाजपेयींनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज (शुक्रवारी) त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

अटलजींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काल संध्याकाळपासून त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवले होते. तर आज सकाळी दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालयात ठेवण्यात आले.