वाजपेयींच्या अस्थींचे आज हरिद्वारमध्ये विसर्जन

102

हरिद्वार , दि. १९ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज हरिद्वारमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विधी सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह आदींसह भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.

अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी देशातील १०० नदींमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. वाजपेयींच्या स्मरणार्थ सोमवारी दिल्लीतील के.डी. जाधव स्टेडियममध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय राज्यांच्या राजधानीतही शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.