वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा

79

नवी दिल्ली , दि. १६ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ‘एम्स’ रुग्णालयात राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. वाजपेयी यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एम्स’ सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मेडिकल बुलेटिन जारी करणार आहे. त्यात वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबतची नवीन माहिती दिली जाणार आहे.