वाघाचे नाव घेऊन सशाच्या काळजाचे सरकार का आणताय?- आशिष शेलार

139

मुंबई, दि.३० (पीसीबी)- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज विधानसभेत महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

महाविकास आघाडीला बहुमत आहे, तर मग भिती कशाची ? आपल्या आमदारांवर मुठभरही विश्वास नाही, मग महाआघाडी कशाची? सत्यमेव जयते म्हणताय मग असत्यमेवची वाट का धरताय? ‘वाघाचे’ नाव घेऊन ‘सशाच्या’ काळजाचे सरकार का आणताय?, असा सवाल शेलारांनी टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या शपथविधीवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विकास आघाडीची बहुमत चाचणी होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडून आपल्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश या व्हीपमध्ये देण्यात आला आहे.

 

 

WhatsAppShare