वाकड, हिंजवडी, चिंचवड, देहूरोडमध्ये महिला अत्याचाराचे चार गुन्हे दाखल

113

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – वाकड, हिंजवडी, चिंचवड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहित महिलांचा छळ केल्याबाबत शनिवारी (दि. 8) हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती नितिन माधवराव देशमुख (वय 42, रा. कात्रप, बदलापूर), सासरे माधवराव अण्णासाहेब देशमुख (वय 66), सासू (वय 62) आणि नणंद (वय 42, तिघेही रा. डोंबिवली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता या सासरी नांदत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घऊन आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचा शाररिक व मानसिक छळ केला. तसेच फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच आरोपी नणंद हिने फिर्यादीच्या पतीला विवाहितेच्या विरोधात भडकावून दिले. हा प्रकार एप्रिल 2019 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत बदलापूर येथे घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती संजीव सुरेंद्र सिंग (वय 34), सासरे सुरेंद्र प्रताप सिंग (वय 65), सासू (वय 65), नणंद (वय 38) आणि दीर राजीव सिंग (वय 34, रा. नेरेगाव, दत्तवाडी, हिंजवडी आणि मालाड, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून माहेराहून पैसे आणण्यासाठी तसेच घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेचा वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून शाररीक व मानसिक छळ केला हा प्रकार 9 जून 2021 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत मालाड, मुंबई आणि हिंजवडी येथे घडला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चिंचवड पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती विवेकानंद प्रभाकर रोकडे, सासरे प्रभाकर किसन रोकडे, दीर प्रमोद प्रभाकर रोकडे, सासू आणि जाऊ (सर्व रा. प्रमोद बिल्डींग, प्रेमलोकपार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून आरोपी पती याला दुसरे लग्न करायचे असल्याने त्यास विवाहितेला त्रास देण्यास सुरवात केली. तसेच तिला घटस्फोटाची नोटीसही पाठविली. माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. लग्नात दिलेले स्त्रीधन काढून घेतले. तसेच वेळोवेळी तिचा शाररीक व मानसिक छळ केला. ही घटना 25 फेब्रुवारी 2011 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत चिंचवड येथे घडली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुजित थीम्मप्पा पुजारी (वय 39), सासरे थीम्मप्पा पुजारी (वय 70), दीर अमोल पुजारी (वय 44), उदय सालियन (वय 46), तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यांना बाळ पाहिजे असताना आरोपींनी विवाहितेला नाकात ड्रॉप टाकण्यासाठी नेऊन त्यांचे बाळ मिस कॅरेज केले. हा प्रकार जुलै 2015 ते मे 2016 या कालावधीत कर्नाटक, बावधन येथे घडला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.