वाकड येथे महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसुत्र लंपास

140

वाकड, दि. १७ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना गुरुवार (दि.१६) रात्री नऊच्या सुमारास वाकड छत्रपती चौक पंजाब नॅशनल बँकेजवळ घडली.

याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी ५८ वर्षीय महिला या वाकड छत्रपती चौकातून पायी घरी निघाल्या होत्या. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपेय किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेला. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.