वाकड येथे खासगी बस पुलाच्या कठड्याला धडकून उलटली; १० प्रवाशी जखमी

89

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – कोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस मुळा नदीवरून खाली कोसळली. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. त्यापैकी १० प्रवाशी जखमी झाले आहेथ. हा अपघात आज (रविवारी) पहाटे चारच्या सुमारास वाकड येथे घडला.

पुलाच्या कठड्याला बस अडकल्याने मोठी हानी टळली. यामध्ये बेलापूर न्यायालयाच्या न्यायाधिश चद्रशिला पाटील आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरा पाटील या मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत.

बोरीवली ते कोल्हापूर अशी एम बी लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९ सी व्ही ३६९७) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. वाकड येथील मुळानदीचे पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण १० प्रवाशी जखणी झाले आहेत. पोलिस तपास करत आहेत.