वाकड येथील भूमकर चौकातील पुलाखाली कंटेनर अडकला

434

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – वाकड येथील भूमकर चौकातील पुणे-मुंबई महामार्गावरील पुलाच्या स्लॅबला कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. आज (गुरूवारी) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कंटेनर अडकला. त्यामुळे हिंजवडीकडून येणारी वाहने खोळंबली.

हिंजवडीकडून डांगे चौकाच्या दिशेने कंटेनर येत होता. त्यावेळी पुलाच्या स्लॅबला कंटेनर अडकला. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दुपारीची वेळ असल्याने वाहतूक कोंडी तितकीशी झाली नाही. भूमकर चौकात वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. वाहतूक कोंडीचा आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना नेहमीच त्रास होत आहे.