वाकड येथील अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

87

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – वाकड येथील मानकर चौकामध्ये ट्रकला मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा उपरादरम्यान मृत्यू झाला. बुधवार (दि.२३ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला होता. रविवारी (दि.१५ जुलै) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमोल महादेव घोडके (वय २३, रा. मंगळवेढा, ता. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल याने (दि.२३ मे) रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वाकड येथील मानकर चौकामध्ये एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान रविवारी (दि.१५ जुलै) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलिस तपास करत आहेत.