वाकड पोलीसचौकी अंतर्गत थेरगाव मध्ये वाहनांची तपासणी

248

चिंचवड,दि.६(पीसीबी) – मागील काही दिवसांपासून थेरगाव व वाकड परिसरात वाहन चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. थेरगाव परिसरातील अनेक वाहने चोरी होण्याच्या घटना समोर आल्या असून, या पार्शवभूमीवर वाकड पोलीस चौकी अंतर्गत वाहनांची चोख तपासणी करण्यात येत आहे.

वाहन चालकांची योग्य शहानिशा करून, ते वाहन त्यांचच आहे कि नाही याची खात्री पोलीस करून घेत आहेत. तसेच विनापरवाना असणाऱ्या वाहनचालकांना आणि संशयित वाटणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी वाकड पोलीस सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत ठेवूनच प्रवास करावा, असं आवाहन वाकड पोलिसांकडून केलं जात आहे.

WhatsAppShare