वाकड पोलिसांचे अभिनंदन: चोरीला गेलेले तब्बल १०१ मोबाईल मूळ मालकांना परत दिले

484

वाकड, दि. १० (पीसीबी) – वाकड पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल १२ लाख रुपये किमतीचे एकूण १०१ मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले आहे. हा कार्यक्रम आज (सोमवार) वाकड येथे पार पडला.

यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदार नागरिक उपस्थित होते.

अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी नागरिकांना मोबाईल फोन जपून ठेवण्याचा आणि काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला दिला. तसेच चोरी झालेल्या मोबाईलचा शोध लावून ते परत मूळ मालकांना परत देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.