वाकड आणि हिंजवडी मध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू

102

वाकड, दि. २५ (पीसीबी) – वाकड आणि हिंजवडी परिसरात दोन अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. वाकड येथे एका दुचाकीस्वाराने रस्त्यावरील खांबाला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर हिंजवडी येथील घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. याबाबत शनिवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड येथील घटनेत अशोक मरगु धोत्रे (वय 50, रा. वडारवस्ती, वाकड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयत धोत्रे शनिवारी (दि. 24) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा डांगे चौकाकडून औंधकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. ओवरब्रिज वरील सार्वजनिक रस्त्यावर असलेल्या खांबाला मयत धोत्रे यांच्या दुचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या धोत्रे यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी येथील घटनेत नामदेव भिंताडे (वय 60) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अमरदास नामदेव भिंताडे (रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमरदास यांचे मयत वडील नामदेव त्यांच्या दुचाकीवरून शिंदे वस्ती मारुंजी येथून जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने नामदेव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नामदेव यांचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना 19 मे रोजी सकाळी 9 वाजता घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare