वाकडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या सहा सराईतांना अटक; साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत

143

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – वाकड आणि पिंपरी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत सहा चोरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २०, रा. लक्ष्मण नगर , थेरगाव), मयूर दिलीप जाधव (वय १९, रा. धुळे), प्रवीण सुरेश बोरसे (वय २९, रा. बीजलीनगर, चिंचवड), शुभम उर्फ दत्त भिकाजी मोहंडे (वय २०, रा. थेरगाव), राजू लक्ष्मण पाटेकर (वय १९, रा. पवना नगर, काळेवाडी), सलमान गौस शेख (वय २४, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या सहा सराईत वाहन चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने चोरांवर आळा घालण्साठी वाकड पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. या पथकाने सहा सराईत वाहनचोरांना अटक केली आहे. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील सहा आणि आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील चार असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत तीन ऑटो रिक्षा आणि आठ मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.