वाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड

39

लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. ही घटना २०१४ ते मार्च २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी सूरज नढे (वय २५, रा. वाकड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी हे २०१४ पासून चिंचवमध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांची मैत्री झाली आणि त्याचेच रूपांतर प्रेमात झाले. प्रेम रुपी रोपटं फुलवण्याचे स्वप्न तरुणी पाहत होती. परंतू सूरज धोका देईल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. सूरजने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून  स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये नेऊन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.  यावेळी मार्च २०१८ मध्ये पीडित तरुणी ही ७ आठवड्याची गरोदर असल्याचे तीला समजले. तरुणीने हा प्रकार आरोपी सूरज नढेला सांगीतला. पण त्याने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने आरोपीचे घर गाठले. सूरजच्या कुटुंबीयांनी देखील तिला स्वीकारण्यास नकार दिला. याऊलट त्यांनी तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला. अखेर २४ वर्षीय पीडित तरुणीने थेट वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुरज नढे विरोधात तक्रार दाखल केली. सूरज विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.