वाकडमध्ये राहत्या घरी महिलेची गळफास घेवून आत्महत्या

934

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठी लिहून महिलेने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास वाकडमध्ये घडली.

मनीषा शशिकांत काळे (वय ४८, रा. कळमकरवस्ती, वाकड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २३) रात्री मनिषा यांचा मोठा मुलगा कामावरून आला. त्याने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा कोणीच न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला. त्यावेळी त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.

दरम्यान, मनीषा यांच्या पतीचे मागील वर्षी हृदयविकाराने निधन झाले. पती नसल्याने त्या घरात नेहमी उदास राहत होत्या. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात ‘माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.