पोलिसात तक्रार दिली म्हणून वाकडमधील महिलेला जीवे मारण्याची धमकी आणि शरीर सुखाची मागणी

1044

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – ड्रायवरने केलेल्या गैरवर्तना विरोधात एका २६ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली म्हणून जामिणावर सुटलेल्या आरोपी ड्रायवरने विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून महिलेला जीवे मारण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित २६ वर्षीय महिलेने वाकड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार रविंद्र बाजु जगपात (वय ३०, रा. डि.मार्ट शेजारी, तापकीरनगर, काळेवाडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र हा पीडित २६ वर्षीय महिलेच्या कारवर ड्रायवर होता. जुलै २०१८ मध्ये त्याने या महिलेसोबत गैरवर्तन केले होते. यावर महिलेने ड्रायवर रविंद्र विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिंजवडी पोलिसांनी त्यानुसार आरोपी रविंद्र यांच्यावर कलम ५०६, ५०४ प्रमाणे कारवाई करुन त्याला अटक केली होती. त्यानंतर काही दिवसातच रविंद्र याची जामिनावर सुटका झाली. बाहेर येताच त्याने पीडित महिलेला २१ ऑगस्टपासून वेळोवेळी मोबाईल फोन करुन, वॉट्सअॅप, फेसबुक वरुन शरीर सुखाची मागणी केली. तसेच असे न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. रविंद्र अद्याप फरार असून वाकड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.