वाकडमध्ये तरूणीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

556

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरूणावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दत्तमंदिर रोड वाकड येथे घडली.

शोएब सलिम शेख (रा. म्हातोबानगर, वाकड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पिडीत तरुणीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शोएब याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापासून ते २६ ऑगस्ट २०१८ पर्यंत आरोपी शेख हा दररोज सायंकाळी साडेपाच वाजता संबंधित पिडीत तरूणीच्या मागे जात असे. त्यानंतर तिचा हात पकडून ’तू माझ्याशी लग्न नाही केलीस, तर तूला आणि तुझ्याआईला बघून घेईन, दुसरीकडे लग्न करायला गेलीस, तर तुझ्याशी माझे लग्न झाले आहे’, असे सांगून धमकी दिली. यावर पीडित तरुणीच्या आईने आरोपी शेख विरोधात वाकड पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.