वाकडमध्ये चोरट्याने पीएमपी बसमधील महिलेची पर्स पळवली

187

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्याची ६० हजार किंमतीचे सोन्याचे गंठन असलेली पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. ही घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी एकच्या सुमारास वाकडमधील १६ नंबर बस स्टॉप ते जगताप डेअरी चौक दरम्यान घडली.

या प्रकरणी कविता दादासाहेब सोनवणे (वय ३६, रा. कावेरीनगर, पोलिस वसाहत, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता ह्या काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास वाकडमधील बस स्टॉप नंबर १६ ते जगताप डेअरी चौक दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडे असलेली पर्स हिसकावून पोबारा केला. त्या पर्समध्ये ६० हजार किंमतीचे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम ९०० रुपये असा एकूण ६० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.