वाकडमध्ये घरी निघालेल्या तरुणाला रिक्षातील तीन ते चार जणांनी ३० हजाराला लुबाडले  

381

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – कामावरून घरी जाण्यासाठी रिक्षाने निघालेल्या तरूणाला रिक्षातील तीन ते चार जणांनी मोबाईल फोन आणि रोख रक्कमेसह सुमारे ३० हजाराला लुबाडले. ही घटना गुरूवारी (दि. १३) सायंकाळी चारच्या सुमारास वाकड येथील भुमकर चौकात घडली.

या प्रकरणी दिपू छोटेलाल वर्मा (वय ३४, रा. बंटी साखरे चाळ, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिक्षा चालकासह दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपू हा गुरूवारी (दि. १३) सायंकाळी चारच्या सुमारास घरी जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. रिक्षा त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना रस्त्यामध्ये रिक्षामध्ये आणखी दोघे जण चढले. त्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा वाकडमधील भुमकर चौकाच्या दिशेने वळवली. भुकमर चौकाच्या परिसरात रिक्षातील तीन ते चार जणांनी मिळून फिर्यादी दिपू यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३० हजार किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने लुबाडून नेला. लुबाडल्यानंतर चोरट्यांनी वाकड चौकाच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.