वाकडमध्ये घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड; पाच गुन्हे उघड

671

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – बंद घराची टेहाळणी करून दरवाजाचे कुलूप उचकटून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ८०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवड जप्त केला आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली आहे.

शुभम शिवानंद स्वामी (वय १९, रा. वडवळ, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड़ी करणाऱ्या चोरट्याची माहिती पोलिसाना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून स्वामी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधित चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याच्या पाच प्रकारांची कबूली दिली. वाकड पोलिस तपास करत आहेत.