वाकडमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची विष पिऊन आत्महत्या

72

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – कौटुंबिक वादातून एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आहे. ही घटना आज सोमवारी (दि.२५) सकाळी वाकड येथून उघडकीस आली.

अविनाश संभाजी पवार (वय ३५, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या व्यक्तीस त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांचे नाव अविनाश पवार असून तो थेरगाव येथील बेलठिकानगर येथील रहिवासी आहे. पोलिसांना त्याच्याकडे एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यामध्ये कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करीत असल्याचे अविनाश यांनी लिहले आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.