वाकडमध्ये कुत्रीला ठार करणाऱ्या तरुणाला अटक

215

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – भटक्या कुत्रीला मारहाण करुन ठार केल्याने एका तरुणाला अटक करण्यात आले आहे. ही घटना सोमवार (दि.१५) रात्री साडेअकराच्या सुमारास शंकर कलाटेनगर वाकड येथे घडली.

रिपन सबुर एस के (वय २३, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्राणी छळ प्रतिबंध अधि कलम (१) (अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार रात्री साडेअकराच्या सुमारास शंकर कलाटेनगर येथे आरोपी रिपन याने एका भटक्या कुत्रीला मारहाण केली. यामध्ये कुत्री जागीच बेशुध्द पडली. हे पाहता प्राणी प्रेमी प्राजक्ता सिंग आणि तिच्या मित्राने कुत्रीला तातडीने औंध येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी कुत्रीला मयत घोषीत केले. याप्रकरणी आरोपी रिपन विरोधात वाकड पोलिस ठाण्यात प्राणी छळ प्रतिबंध अधि कलम (१) (अ) अनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. वाकड पोलिस तपास करत आहेत.