वाकडमध्ये आजारपणाला कंटाळून ८४ वर्षीय वृद्धाची आत्महत्या

203

वाकड, दि. १३ (पीसीबी) – आजारपणाला कंटाळून एका ८४ वर्षीय वृद्धाने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

परसराम बडगुजी भैसो (वय ८४, रा. पार्कवेज सोसायटी, दत्त मंदिर रोड, वाकड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसराम हे दुर्धर आजाराने ग्रासले होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी तीसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घराच्या बेडरूममधल्या खिडकीतून खाली उडी घेतली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. सोसायटीतील नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाकड पोलीस तपास करत आहेत.