वाकडमधून ४ किलो गांजा जप्त; गांजा विक्रेत्यास अटक

337

वाकड, दि. २ (पीसीबी) – विक्री करण्यासाठी आणलेला ४ किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६४ हजार रुपयांचा गांजा वाकड पोलिसांनी आरोपीसहीत जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोर करण्यात आली.

चंदू प्यारअप्पा पुजारी (वय ६०, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री वाकड पोलिसांना काळाखडक येथे एक इसम गांजा विकत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळाली. यावर पोलिसांनी सापळा रचून काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोरून चंदू याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील पिशवीमध्ये तब्बल ४ किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६४ हजार रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासहीत आरोपी चंदू याला अटक केली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.