वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या यादीत सलमान खान ३९ वा गुन्हेगार

69

अभिनेता सलमान खानचे नाव वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या वेबसाईटवरही झळकले आहे. त्याची ३९ व्या गुन्हेगाराच्या रुपात नोंद झाली आहे. या यादीत त्याला त्या गुन्हेगारांमध्ये ठेवले आहे, जे वाघासह इतर संरक्षित वन्यजीवांची शिकार, तस्करी आणि त्यासंबंधित गुन्ह्यात सापडले आहेत.
काळवीट शिकार प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर कोर्टाने सलमान खानला ५ एप्रिल रोजी पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र दोन दिवसांनंतर त्याची जामीनावर तुरुंगातून सुटका झाली.ब्युरोच्या वेबसाईटवर सर्वाधिक १५ गुन्हेगार वाघांच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. हे गुन्हेगार महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातील आहे. यानंतर खवल्या मांजरीच्या शिकारीसंबंधित सहा गुन्हेगारांचे नाव यादीत आहे, ते पश्चिम बंगालमधील आहेत.

तर सलमान हा एकमेव गुन्हेगार आहे, जो काळवीट शिकारीशी संबंधित आहे. या यादीत केरळ, दिल्ली, हरियाणाचे गुन्हेगाराचांही समावेश आहे.