वसईत मुसळधार पाऊस; मिठागर परिसरात ४०० जण अडकले

65

वसई, दि. ९ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने वसई मिठागर परिसरात ४०० जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने या वस्तीत पाणी शिरले आहे.

वसई, नालासोपारा, विरार परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वसई पूर्वेकडील मिठागर पाण्याखाली गेले आहे. या मिठागर परिसरात मिठागर कामगारांची घरे आहेत. सुमारे ४०० जण या वस्तीमध्ये वास्तव्यास आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने मिठागर परिसरातील वस्तीत पाणी शिरले आहे. या वस्तीत पाणी शिरल्यानंतर अद्यापही बचावकार्य सुरू झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आले असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.