वल्लभनगर येथे बसला मागून धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी

58

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – बसला मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (बुधवार) पहाटे साडेपाच्या सुमारास वल्लभनगर येथील आयसीसी कंपनी समोर असलेल्या पुणे-मुंबई महामार्गावर घडला.

युसूफ शेख असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवार पहाटे साडेपाच्या सुमारास युसूफ शेख हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच/१४/जीजी/१९१५) वल्लभनगर येथील आयसीसी कंपनी समोर असलेल्या पुणे-मुंबई महामार्गावर घेऊन जात असताना, त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा थेट पुढून चालेल्या  बसवर जाऊन जोरात आदळली. यात त्यांच्या चेहऱ्याला गंभीर मार लागला आणि ते बेशुध्द पडले. त्यांना उपचारासाठी संत तुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रिक्षाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.