वल्लभनगरमध्ये वाहन परवाना देण्यास पैसे घेतात म्हणून पोलीस अधिकारी पांढरेंना काळे फासले

908

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – वाहन परवाना देण्यासाठी पैसे घेतात म्हणून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटार वाहन निरीक्षक सिध्दीराम पांढरे यांना काळे फासले. ही घटना आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास वल्लभनगर येथील वाहन चाचणी केंद्रात घडली.

सिध्दीराम पांढरे असे काळे फासण्यास आलेल्या मोटार वाहन निरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोटार वाहन निरीक्षक सिध्दीराम पांढरे हे कर्तव्यावर असताना त्यांना काळे फासले. वाहन परवाना देण्यासाठी पांढरे हे पैसे घेतात. येवडेच नाही तर पैसे गोळा करण्यासाठी त्याने एक स्वतंत्र माणूस देखील ठेवला असल्याचा आरोपी प्रहार संघटनेने केला आहे. पांढरे यांच्यावर कारवाई करण्यातयावी यासाठी प्रहार संघनेच्या काही कार्यकर्त्यांनी आरटीओचे मुख्य अधिकारी आनंद पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रहार संघटनेने पांढरे यांना काळे फासल्याचे सांगितले आहे.