वफादार…घरात काम करणा-या नोकरानेच ‘अश्या’ प्रकारे पळवले लाखोंचे दागिने

19

चिंचवड, दि. 30 (पीसीबी) : घरात काम करणा-या नोकराने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून मालकाच्या घरातून तीन लाख 95 हजारांचे सोने आणि हि-याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे उघडकीस आली.

अंकुर गोयल (वय 41, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नोकरासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात काम करणा-या नोकराने फिर्यादी यांच्या घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीन लाख 95 हजारांचे सोन्याचे व हि-याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर त्याच्या साथीदारांच्या ओळखीच्या सोनाराला ते दागिने विकले आणि त्याबदल्यात पैसे घेतले. हा प्रकार 14 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare