वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बाप लेका वर खुनी हल्ला

148

हिंजवडी, दि. 27 (पीसीबी) : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून भावकीतील चार जणांनी बापलेकावर खुनी हल्ला केला. कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने मारहाण  केल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पारखेवस्ती, माण येथे घडली.

शशिकांत भगवान सुतार (वय 35), भगवान बळीराम सुतार (वय 62, दोघे रा. पारखेवस्ती, माण, ता. मुळशी) अशी जखमी झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. याबाबत शशिकांत यांच्या पत्नी प्रियांका शशिकांत सुतार (वय 30) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विजय हनुमंत सुतार, सौरभ विजय सुतार, वैभव विजय सुतार, शीतल विजय सुतार (सर्व रा. पारखेवस्ती, माण, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नातेवाईक आहेत. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यातून रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांचे पती शशिकांत सुतार आणि सासरे भगवान सुतार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कु-हाड, लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने मारहाण केली. यात दोघांच्या हाताला, पायाला फ्रॅक्चर करून डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शितल सुतार याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare