वडिलांनी आईचे एटीएम कार्ड मुलाकडे मागितले म्हणून मुलाने बहिणीवर कोयत्याने वार केले

55

पिंपळे सौदागर, दि. १८ (पीसीबी) – वडिलांनी मुलाकडे त्याच्या आईचे एटीएम कार्ड मागितले. त्याचा राग आल्याने मुलाने त्याच्या बहिणीवर कोयत्याने वार करत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेअकरा वाजता पिंपळे सौदागर येथे घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

राजीव रविकर हरकरे (वय 41, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रविकर शंकर हरकरे (वय 69, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी विनया ही जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड आरोपी मुलगा राजीव याच्याकडे होते. ते एटीएम कार्ड फिर्यादी यांनी परत मागितले. त्याचा राजीव याला राग आला. त्यावरून त्याने फिर्यादी यांची मुलगी आणि राजीव याची बहीण विनया यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी राजीव याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत गोसावी तपास करीत आहेत.