वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

87

भोसरी, दि. 25 (पीसीबी) : विनाकारण वडिलांना शिवीगाळ केल्याने मुलाने त्याचा जाब विचारला. त्यावरून तीन जणांनी मिळून जाब विचारणा-यास आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

विष्णू महादेव जाधव (वय 30), कृष्णा महादेव जाधव (वय 33), महादेव सटवा जाधव (वय 50, रा. लांडेवाडी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोकुळ बबन जाधव (वय 33, रा. टेल्कोरोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना काहीएक कारण नसताना शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता त्यांना हातातील धातूच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या भावाला आणि फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare