वडमुखवाडीत एटीएम मशीन कापून पैसे चोरण्याचा प्रयत्न

331

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – एटीएम मशीन गॅस कटरने कापून काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन कापता न आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे साडेतीनच्या सुमारास दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवर घडली.  

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी साईनगरी वडमुखवाडी येथे असलेल्या एका खाजगी बॅकेच्या एटीएम सेंटरवरचे कॅमेरे सिल करुन एटीएममशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना ते कापताच न आल्याने त्याने तेथून पळ काढला. यामुधे संबंधीत एटीएमचे तब्बल ५० हजारांचे नुकसान झाले आहे. दीघी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.