वडगाव मावळात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहात अटक

206

वडगाव, दि. २८ (पीसीबी) – जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (मंगळवारी) वडगाव मावळ येथे करण्यात आली.

संजय राजाराम कांबळे (वय ५५, रा. सजा वडेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा नोंदवण्यासाठी तलाठी संजय कांबळे यांनी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबद्दल तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी आज वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.