वडगाव मध्ये ‘मोरया महिला सन्मान २०२०’ कार्यक्रम उत्साहात साजरा

184

वडगाव,दि.९(पीसीबी) – वडगाव मावळ मध्ये मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित ” मोरया महिला सन्मान २०२०” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी आरोग्य,सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशाताई (आरोग्यसेविका), घरकाम करणाऱ्या महिला, नर्सिंग कोर्स प्रशिक्षणार्थी महिला तसेच महिला खेळाडूंना मान्यवर तसेच संचालिकाच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले.
तसेच प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या मान्यवर व सर्व महिलांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

मोरया महिला सन्मान २०२० या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापिका सारिकाताई शेळके, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले,भाग्यश्री ठाकूर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेविका शारदा ढोरे, प्रमिला बाफना, पूनम जाधव, माया चव्हाण,चेतना ढोरे,अबोली ढोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सौ.दिप्ती पन्हाळकर यांचे ‘महिला सक्षमीकरण” या विषयावर व्याख्यान झाले तसेच वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशजी निबांळकर व सारिकाताई शेळके यांनी महिलांना “स्वरक्षण” या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच समाजातील सर्वच घटकांनी महिलांचा आदर व प्रतिष्ठा राखली जावी याकरिता प्रतिष्ठानच्या वतीने शपथ देण्यात आली. यावेळी वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.