”वटपौर्णिमेनिम्मित एक हजार वडाच्या रोपांचे वाटप”

65

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल उबाळे यांचा स्तुत्य उपक्रम

निगडी दि.२२ (पीसीबी)- देशात मोठया प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा भयंकर तुडवडा निर्माण झाल्याने वृक्षलागवडीचे गांभीर्य लक्षात घेता व वटपौर्णिमेला असलेले कोरोनाचे संकट याची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल उबाळे यांनी “एक हजार वडाच्या रोपांचे वाटप” करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

येत्या २४ जुनला वटपौर्णिमा आहे आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पुजा करावी व वाटप केलेल्या रोपाचे योग्य संगोपन करून वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करावे, वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला असुन कोरोना काळात कित्येक रुग्णांचा “ऑक्सिजन” वाचुन जीव गेला आहे, वडाच्या रोपाची पुजा व त्याचे संगोपन करण्याचे आवाहन आयोजक विशाल उबाळे यांनी केले आले, वडाचे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करते त्यामुळे वडाच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट ठेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व स्वर्गीय आर.आर पाटील प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर व मा.विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते यमुनानगर निगडी भागातील महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, महिला शहर उपाध्यक्षा आशा शिंदे, चिंचवड विधानसभा महिला उपाध्यक्षा वंदना कांबळे, वार्ड अध्यक्षा वैशाली पवार, सामजिक कार्यकर्त्या योगिता उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, भोसरी विधानसभा सरचिटणीस अक्षय भोरे, भोसरी विधानसभा संघटक रोहित राऊत, कामेश तरस, मधुराज पवळे, राजकुमार रणधीर, अमोल उजगरे, पंकज नवले, अनीश जेसाराम, महेश चौगले, प्रतीक टांगडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

WhatsAppShare