‘वंटास’ चित्रपटाच्या निर्मात्याला ९ किलो सोने पळवून नेताना अटक

862

मुंबई , दि. २ (पीसीबी) –  व्यापाऱ्याने गाळण्यासाठी दिलेले ९ किलो सोने ‘वंटास’ चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे हा पळवून नेत असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. चित्रपटात नुकसान झाल्याने त्याने हे पाऊ उचलले असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळबादेवी परिसरात अमोल हा भागीदारीतून सोने गाळण्याचा व्यवसाय करतो. त्याला २१ जुलैला एका व्यापाऱ्याने ९ किलो सोने गाळण्यासाठी दिले होते. मात्र, ते सोने गाळण्याऐवजी अमोलने सोने घेऊनच पळण्याचा प्लॅन केला. त्यावेळी व्यापाऱ्याने त्याच्या नोकराला पाठवले. मात्र, त्याला झोप लागल्याने संधीचा फायदा घेत अमोल लवटे ते सोने घेऊन साथीदारांसह फरार झाला. त्यानंतर व्यापाऱ्याने अमोल लवटेविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अमोलला अटक केली.