लोणी टोलनाक्याजवळ रसायनांनी भरलेला ट्रक आगीत जळून खाक

35

पुणे, दि. ४ (पीसीबी) –  पुणे येथील लोणी टोल नाक्याजवल रसायनांनी भरलेल्या एका ट्रकला आग लागून ट्रक जळून खाक झाला आहे. आग लागण्याने ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) पहाटे ट्रक रासायनिक पदार्थांनी भरलेले २५ बॅरल घेऊन निघाला होता. त्यावेळी तो ट्रक लोणी टोलनाक्याजवळील विभाजकाला धडकला. त्यामुळे रसायनांनी भरलेल्या बॅरल मध्ये स्फोट होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर संपूर्ण ट्रकला आग लागून ट्रक जळून खाक झाला. ट्रकच्या चालकाने ट्रकपासून दूर जात कसाबसा आपला जीव वाचवला. पोलिस तपास करत आहेत.