लोणी काळभोर येथे पोलिसाला जबर मारहाण करुन  डोक्या दगड घालण्याचा प्रयत्न

469

लोणी काळभोर, दि.२६ (पीसीबी) – दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरुन दोघाजणांनी एका  पोलीस हवालदाराला शिवीगाळ करुन मारहाण करत डोक्यात दगड घालून त्यांना जीवेमारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच बाजूला सरकल्याने हवालदाराचा जीव वाचला आहे. ही घटना बुधवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास लोणी काळभोर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ घडली.

संतोष मधुकर जावीर ( वय २८, रा. साई शांती अपार्टमेंट, लोणी काळभोर) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मयूर विलास काळभोर व अक्षय आण्णा चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार अक्षय चव्हाण या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार विलास काळभोर अद्याप फरार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पोलिस हवालदार संतोष जावीर हे पुणे ग्रामीण मुख्यालयात पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते काम आटपून त्यांच्या दुचाकीवरुन लोणी काळभोर येथील त्यांच्या घरी निघाले होती. ते लोणी काळभोर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक आले. रस्ता लहान व पुढे दोन लहान मुले चालत असल्याने त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी करुन दुचाकी बाजुला घेतली तरीही बुलेट पुढे घेता न आल्याने विलास काळभोर याला त्याचा राग आला. त्याने जावीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काळभोर याने रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड ऊचलून त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधान राखून ते वेळीच बाजूला झाल्याने ते वाचले. पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली आहे. मात्र विलास काळभोर अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे तपास करत आहेत.