लोणावळ्यात दोन मावस भावांचा तलावात बुडून मृत्यू

57

लोणावळा, दि. २८ (पीसीबी) – लोणावळ्यातील वरसोली टोल नाक्याजवळ असलेल्या एका कुत्रीम तलावत दोन कचरा वेचणाऱ्या मावस भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी आठच्या सुमारास घडली.

सोनू रफिक शेख (वय १४, रा. वाकसईचाळ, लोणावळा) व अस्लम इस्माईल मुजावर (वय १५,  रा. पुणे) अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास सोनू आणि अस्लम हे दोघे कचरा वेचण्यासाठी लोणावळ्यातील वरसोली टोल नाक्याजवळ असलेल्या कचरा डेपोत घेले होते. तेथे बनवण्यात आलेल्या एका कुत्रीम तलावात  दोघेही बुडाले. यापैकी सोनू याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले मात्र अस्लम इस्माईल मुजावर याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. शिवदुर्ग रेक्यू पथक अस्लम  मुजावर याच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.