लोणावळ्यात कारचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू चारजण गंभीर

167

लोणावळा, दि. १५ (पीसीबी) – कारवरचे नियंत्रण सुटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री उशीरा घडली.

सीताबाई किसन शिंदे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा शिंदे कुटुंब हे मूळ गावरून मुंबईच्या दिशेने कार (क्र.एमएच/४३/बीके/३७४५) जात होते. यावेळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किलोमीटर ६० येथे त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये सीताबाई यांचा मृत्यू झाला. शिंदे कुटुंब हे मूळचे सातारा येथील असून ते कामानिमित्त ठाणे येथे असतात. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.