लोणावळ्यात इंजिन ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

452

लोणावळा, दि. २४ (पीसीबी) – लोणावळ्याजवळील मंकीहिल येथे आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती.  इंजिन ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र दरड हटवण्यापर्यंत मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास लोणावळ्याजवळील मंकीहिल येथील रेल्वे ट्रकवर दरड कोसळी होती. ही बाब लक्षात येताच इंजिन ड्रायव्हरने तातडीने गाडी थांबवून रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि दरड सरकवून रेल्वे मार्ग सुरळीत केला. दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वेमार्ग ब्रिटीशकालीन आहे. या परिसरात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.