लोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून इंजिनिअरचा मृत्यू

453

लोणावळा, दि. २० (पीसीबी) – मित्रांसोबत लोणावळ्यातील कुरवंडे गावाच्या हद्दीत असलेल्या नागफणी पॉईंट वर फिरायाल गेलेल्या एका रेल्वेतील सिनियर सेक्शन इंजिनिअरचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) दुपारी चारच्या सुमारास घडली.

रोहन महाजन (वय ३२, रा. पडघा, माटूंगा, रेल्वे सिनियर सेक्शन इंजिनिअर माटूंगा) असे  दरीत पडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी  रेल्वे विभागात कामाला असलेले काही अधिकारी कर्मचारी लोणावळ्यातील  कुरवंडे गावाच्या हद्दीत असलेल्या नागफणी पॉईंट वर फिरायला गेले होते. यावेळी खाली उतरत असताना रोहन याचा पाय घसरल्याने तो खोल दरीत तब्बल चारशे फुट खाली पडला. या घटनेमध्ये गंभीर जखमी होऊन रोहनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस पथक व शिवदुर्ग रेस्कू पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोध मोहिम सुरु केली आहे. मात्र रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला असून शिवदुर्ग रेस्कू पथक त्याचा मृतदेह  बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र धुक आणि पाऊस यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचनींना सामोरे जावे लागत आहे.